Share

राहुल गांधी परदेश दौऱ्यावर; शेतकरी आंदोलनातील नेत्याने केली घणाघाती टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात जात आहेत. परिणामी राहुल गांधी आज काँग्रेसच्या स्थापना दिवसालाही उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले,केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते तारिक अन्वर या बैठकीला हजर असतील.

दरम्यान,’आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी कतार एअरवेजच्या फ्लाइटने इटलीतील मिलानसाठी रवाना झाले आहेत. त्यांची आजी इटलीत राहते आणि त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यापूर्वीही तिथे गेले आहेत.

दरम्यान,केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत, असे टि्वट करुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

दरम्यान,शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!