🕒 1 min read
नवी दिल्ली: श्रीलंकेवर सध्या आर्थिक संकट कोसळले (Sri Lanka in financial crisis) आहे. त्यामुळे येथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारविरोधातील संतापामुळे श्रीलंकन नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरवात केली. गुरुवारी रात्री उशीरा येथील स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले.
घोषणाबाजी करत राष्ट्रपतींनी राजानीमा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी पाच हजारहून अधिक लोक श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबो शहरामध्ये रस्त्यावर उतरले. हे आंदोलन रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स आणि अर्धसैनिक दलाचा वापर करण्यात आला. या ठिकाणी सध्या कर्फ्यु लावण्यात आला असून वातावरण गंभीर बनले आहे.
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक सुरु केल्याने पोलिसांनी श्रूधुराबरोबरच पाण्याचा मारा करुन आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. याचाच समोर आलेल्या एका व्हिडीओत आंदोलनकर्त्यांनी बाईकवरुन जाणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अडवून त्यांची कोंडी केल्याचे दिसून येते आहे. यावेळी एका बसलाही आग लावण्यात आली. डिझेल नसल्याने १३ तासांहून अधिक काळ श्रीलंकेत ब्लॅकआऊट होता.तसेच वीज पुरवठा खंडित करण्याचा परिणाम सरकारी रुग्णालयांवरही पडला. कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगही केवळ अर्धा ते दोन तासामध्ये गुंडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तर वीज वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवेही बंद करण्यात आले आहेत. यावरून श्रीलंकेची आर्थिक स्थिती किती संकटात आहे, याचा प्रत्यय येतो.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 : CSKचा डीजे ब्रावो बनला आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू!
IPL 2022 : CSKच्या शिवम दुबेची धुव्वादार बॅटिंग! चाहत्यांना आठवला युवराज सिंग
IPL 2022 : थाला..थाला..थाला! महेंद्रसिंह धोनीचा मुंबईत मोठा पराक्रम; नक्की वाचा!
IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
