मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या सोमवार दि.25 जानेवारी रोजी 5 दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दि. 26 जानेवारी रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन रामदास आठवले दुबईत साजरा करणार आहेत.
दि.26 जानेवारी रोजी सकाळी दुबईतील अल हमरिया, डिप्लोमॅटीक इन्कलेव्ह येथील भारतीय उच्चायुक्तालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून 72 वा प्रजसत्ताक दिन दुबईत साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरतीत दुबई आणि अबुधाबी या शहरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार आहेत.
पाच दिवस आठवले संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अबुधाबी येथे टी-10 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्या संदर्भात प्रश्न केला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगत आहेत की, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’ असा टोला आठवलेंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- औरंगाबाद मनपा निवडणूक टप्प्यात, शहर भाजपकडून ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
- समाजातील वचिंत आणि दिव्यांगांना डावलून विकास होऊ शकत नाही : अशोक चव्हाण
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

