🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :- मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले,नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
It’s 3 yrs since the Demonetisation terror attack that devastated the Indian economy, taking many lives, wiping out lakhs of small businesses & leaving millions of Indians unemployed.
Those behind this vicious attack have yet to be brought to justice. #DeMonetisationDisaster pic.twitter.com/NdzIeHOCqL
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2019
नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192696922630344705?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192699902867853312?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192700133210615808?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
