नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी राहुल द्रविडने विराट कोहलीचे खूप कौतुक केले आहे आणि त्याला एक महान कर्णधार म्हणून संबोधले आहे.
राहुल द्रविडच्या म्हणण्यानुसार, अनेक वादानंतरही विराट कोहली आपल्या कर्णधाराची भूमिका अधिक चोखपणे पार पाडत आहे. त्याने संघाचे मनोधैर्य खचू दिलेले नाही आणि ड्रेसिंग रूममध्येही चांगले वातावरण आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत राहुल द्रविड कोहली बद्दल बोलताना म्हणाला, “मला माहित आहे की या कसोटी सामन्यापूर्वीही अनेक गोष्टी घडल्या होत्या. पण संघाचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याबद्दल बोलायचे झाले तर अजिबात अडचण नव्हती कारण हे काम स्वतः कर्णधार विराट कोहली करत होता.”
गेल्या दोन आठवड्यांपासून तो सातत्याने संघाशी जोडला गेला आहे. मला असे वाटते की पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आमचा संघ खूप चांगल्या स्थितीत होता आणि विराट कोहली स्वतः संघाचे नेतृत्व करत होता. विराट कोहलीसोबत काम करणे खूप छान आहे, तो खरोखरच महान कर्णधार आहे
भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकला असून सोमवारपासून जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकू शकते. भारताने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही पण यावेळी त्यांच्याकडे मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
महत्वाच्या बातम्या
- दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध वनडे संघ जाहीर
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

