मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया मुख्य खेळाडूंविना श्रीलंकेचा दौरा करेल. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यासारखे खेळाडू या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. कारण यावेळी ते इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार टीम इंडिया श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी -२० मालिका खेळणार आहे.
जुलै महिन्यात वरिष्ठ पुरुष संघासाठी मर्यादित षटकांच्या मालिकेचे नियोजन केले आहे. जेथे ते श्रीलंकेत टी -20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय सामने खेळतील. मर्यादित षटकांच्या मालिकेत भाग घेणारा संघ इंग्लंडला गेलेल्या संघापेक्षा वेगळा असेल असे सौरभ गांगुली यांनी स्पष्ठ केले आहे.
क्रिकेट बोर्डने मर्यादित षटकांचे नियमित खेळाडूदेखील लक्षात ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीलंका दौर्यावर कमीतकमी टी -२० आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असू शकतात. शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल यासारखे खेळाडू सामन्यांसाठी सज्ज असावेत, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. यात देवदत्त पद्धिकल, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल असे खेळाडू असू शकतात. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंची पथ निवडल्यास त्यात 6 फलंदाज, 3 अष्टपैलू, 2 फिरकीपटू, 2 विकेटकीपर आणि 4 वेगवान गोलंदाज असतील.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि इतर सहाय्यक कर्मचारी मुख्य भारतीय संघासह इंग्लंडमध्ये राहणार असल्यामुळे बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. Cricbuzz च्या वृत्तानुसार या संकल्पनेवर विचार सुरू असल्याचं म्हंटल जात आहे. आणि द्रविड खेळाडूंसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मधील काही सहाय्यक कर्मचार्यांसह श्रीलंका येथे येण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- इंग्लंडमधील भारतीय संघाचा १४ वर्षाचा वनवास संपेल का..?
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ


