Share

IND vs SA : ऐकावं ते नवलच..! खुद्द द्रविडनंच शिखर धवनला केलं संघाबाहेर; BCCIच्या अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट!

Published On: 

मुंबई : टीम इंडियाला पुढील महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. ही मालिका ९ ते १९ जून दरम्यान चालणार आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर वरिष्ठ फलंदाज शिखर धवनलाही संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र तो संघाबाहेर आहे. धवनची कामगिरी इशान किशन ते पंत यांच्यापेक्षा सरस होती. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली नव्हती.

एका बातमीनुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडमुळे शिखर धवनला संघात स्थान मिळाले नाही. बीसीसीआय (BCCI)च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की शिखर एक दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये सामील आहे. पण टी-२० मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी द्यावी लागेल. राहुल द्रविडला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सर्वांनी ते मान्य केले. संघाची घोषणा करण्यापूर्वी द्रविडने धवनला याबाबत सांगितले होते. धवनने टी-२० लीगच्या चालू हंगामात पंजाब किंग्जकडून सर्वाधिक ४६० धावा केल्या.

https://twitter.com/sportstigerapp/status/1528698300508954625

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये टी-२० विश्‍वचषकाचे सामने होणार आहेत. म्हणजेच या आयसीसी स्पर्धा सुरू होण्यास ५ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या युवा वेगवान गोलंदाजांना संघात प्रथमच संधी मिळाली आहे. याशिवाय कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून पंड्या संघाबाहेर होता. पण चालू मोसमात त्याने कमालीची कामगिरी केली आहे.

भारताचा टी-२० संघ –

केएल राहुल (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!