मुंबई : राज्यसभेसाठी छत्रपती संभाजी राजे यांची उमेदवारी नाकारत शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव घोषित केले आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊतांनी विरोध केला होता.
त्यामुळे राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाला आहे. यावरूनच आता मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक अंकुश कदम यांनी थेट संजय राऊतांना इशाराचं दिला आहे.