Share

ind vs pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने केला मोठा खुलासा; हा अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध खेळल्यास आमची सुधारणा होईल, असे ते म्हणालेत. आशिया कपमधील सुपर फोरमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत द्रविड म्हणाला की, हा सामना इतर सामन्यांसारखाच आहे. आम्ही जिंकलो तर चांगले आणि हरले तर आम्हाला श्रीलंकेविरुद्ध खेळावे लागेल. आमच्याकडे दर्जेदार खेळाडू आहेत. पाकिस्तान हा संघ चांगला आहे पण आम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी अशा सामन्यांची गरज आहे. तुम्ही खेळाडूंना न्याय देऊ शकता आणि मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरेही मिळू शकतात.

द्रविडने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहचे कौतुक केले. तो म्हणाला की नसीम शाहने चांगली गोलंदाजी केली पण आमच्या फलंदाजांनीही पाकिस्तानविरुद्ध धावा केल्या. पाकिस्तानकडे काय आहे ते आम्ही पाहत नाही, आम्हाला स्वतःच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असाही ते यावेळी म्हणाले.

तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याला संघात स्थान मिळेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही. प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीच्या वेळीच कळेल पण द्रविडने आधीच एक बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

द्रविडने आवेश खानच्या प्रकृतीबद्दल सांगितले. येत्या सामन्यांमध्ये तो बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. अशा स्थितीत आवेश प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्याशिवाय जडेजाच्या जाण्याने एक जागाही रिक्त झाली आहे. आता जडेजाच्या जागी कोण खेळणार हे टॉसवेळी मंदानातच पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!