Share

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण ओव्हरफ्लो

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण आज सकाळी ओव्हर-फ्लो झाले. या धरणात १९७२ पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणाच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणाच्या सर्व अकरा दरवाज्यातून जायकवाडीकडे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

धरणाची पाणीपातळी, नवीन पाण्याची आवक, याचा आढावा घेऊन सोडण्यात आलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला किंवा कमी केला जाईल, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशभर दुखवटा आहे. त्यामुळे धरणावरील जलपूजनाचा शासकीय कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती सायली पाटील यांनी दिली.

मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी मुळा नदीतील वीजपंप तत्काळ काढून घ्यावे. नदीतील विसर्ग जास्त असल्याने जीवित अथवा वित्तहानी झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही. तसेच पाण्याचा उपसा कोणी करू नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सायली पाटील यांनी दिला आहे.

प्रणवदांनी दिली होती हेडगेवार निवासस्थानाला भेट नोंदवली आहे ही प्रतिक्रिया

या निमार्णाधीन राष्ट्रीय महामार्गाच्या अनियमिततेसाठी या धडाकेबाज पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

बैलाने गिळले मंगळसूत्र मग…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!