Share

बैलाने गिळले मंगळसूत्र मग…

Published On: 

🕒 1 min read

शिरूर/ऋषिकेश घोगरे : एखाद्या शेतकऱ्याचे आपल्या मुक्या जनावरावर किती प्रेम असू शकते याची एक घटना नुकतीच शिरूर तालुक्यात घडली. या घटनेची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा चालू आहे. पोळा सणाच्या दिवशी बैलाचे औक्षण करून सोन्याचे मंगळसूत्र ताटात बाजुला ठेवले असता, ते नकळत बैलाच्या खाण्यात आले, मात्र मालकाला याबाबत खात्री नव्हती, शेवटी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक्स-रे काढण्याचे ठरले. एक्स-रे काढल्यानंतर मंगळसूत्र पोटात असल्याचे निदान झाले.

अखेर शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढण्याचे ठरले होते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भारती ही शस्त्रक्रिया करणार होते. पण बैलाचे मालक दादासाहेब झांजे खूपच हळवे मनाचे गृहस्थ. बीड जिल्ह्यातील वायरा, ता.आष्टी हे त्यांचे मूळगांव. सोने पोटातच आहे म्हटल्यावर आणि शस्त्रक्रिया करावी लागणार म्हटल्यावर मालकाच्या डोळ्यात पाणी आले, आवाज गहिवरला, आणि त्यांनी सांगितले डॉक्टर साहेब मंगळसूत्र फक्त ५० ते ६० हजाराचं आहे, पण बैलाला त्याचा त्रास होणार असेल आणि माझा बैल जर शस्त्रक्रियेनंतर अधू होणार असेल तर सोने पोटातच राहु द्या.

अखेर पशुधन विकास अधिकारी डॉ.दीपक औताडे यांनी झांजे यांची समजूत काढून शस्त्रक्रियेस राजी केले. त्यानुसार बैलाची शस्त्रक्रिया ठरली होती परंतू सकाळ-सकाळी ते मंगळसूत्र बैलाच्या विष्टेतून बाहेर पडले. याबाबत बोलताना डाॅ.औताडे म्हणाले, शक्यतो असे कधी घडत नाही, कारण जड वस्तू पोटात खाली बसते परंतु हे फक्त बैलाच्या प्रेमा पोटीच झाले आहे.

मंदिर-मशीदी ईम्तीयाज जलीलांची खाजगी मालमत्ता नाही-शिवसेना आमदार दानवेंंचा टोला

हिंदु मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ ; चंद्रकांत खैरेंचा घणाघात

इम्तियाज जलीलांची मंदिर प्रवेशावरून अखेर माघार!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!