Share

या निमार्णाधीन राष्ट्रीय महामार्गाच्या अनियमिततेसाठी या धडाकेबाज पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर संपणार्‍या अकोला-आर्णी या निमार्णाधीन राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या कंपनीद्वारे अनियमितता झाल्याच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

हातना आणि आमगव्हान या दोन गावातील ई-वर्ग जागेवर शेततलाव खोदून त्यामधील गौण खनिज महामार्गाकरीता वापरण्यात यावे असा करार झाला होता. सामंजस्य करारातील तरतुदीनुसार तहसीलदार, मानोरा यांनी हातना आणि आमगव्हान येथील केवळ एक हेक्टर जागा यासाठी उपयोगात येणार होती पण ही जागा मुद्दाम टेकडीची देण्यात आल्याची तक्रार अँड. श्रीकृष्ण राठोड यांनी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही कारवाई झाली नसल्याने याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाधिकारी कार्यालयाला उशिरानेच का होईना खडबडून जाग आल्याचे पाहावयास मिळते आहे. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी उपजिल्हाधिकारी, रोहयो शाखा यांना अँड. श्रीकृष्ण राठोड यांच्या ९ जुलै २0२0 च्या तक्रारीत नमूद बाबींची व्यक्तिश: चौकशी करावी आणि तक्रारदार यांना परस्पर अवगत करावे, असे पत्राद्वारे कळविले आहे. यापूर्वी उपविभागीय कृषि अधिकारी वाशीम यांनी मोघम अहवाल दिल्याचा बोलबाला असताना आता रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी निष्पक्ष आणि वस्तुस्थितीदर्शक चौकशी करुन अहवाल सादर करतात का? याबाबत संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागलेली आहे. तालुक्यामध्ये निमार्णाधीन असलेल्या राष्ट्रीय महामागार्साठी नियुक्त कंपनीद्वारा मोठ्या प्रमाणात शासकीय महसूल बुडविल्या प्रकरणी कोट्यावधी रुपयाचा दंड याआधी झालेला आहे.

सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो शक्य नाही!

मंदिर-मशीदी ईम्तीयाज जलीलांची खाजगी मालमत्ता नाही-शिवसेना आमदार दानवेंंचा टोला

हिंदु मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ ; चंद्रकांत खैरेंचा घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!