🕒 1 min read
Radha Krishna Vikhe Patil । मुंबई : ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती. यानंतर या सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूकही जिंकली. त्यानंतर सरकारचा विश्वासदर्शक ठरावाही बहुमताने जिंकला. शिंदे सरकारने आता राज्यातील विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. पाटलांनंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले १५ पैकी अनेक आमदार तसेच १२ हुन अधिक खासदार सुद्धा बाहेर पडतील, असं ते म्हणाले. तर भरकटलेले जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिली असल्याचा टोला देखील विखे पाटील यांनी संजय राऊतांच नाव न घेता लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंचे टेन्शन आणखी वाढवणार आहे.
दरम्यान, शिवसेनेला दिवसेंदिवस मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. आज ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. तर दुसरीकडे नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज रात्री हि भेट होण्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
