Share

Satara : मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत ‘या’ मोठ्या प्रकल्पाची घोषणा; साताऱ्यासाठी घेतला महत्वपुर्ण निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडाका लावला आहे. राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. तसेच एकनाथ शिंदे संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल. तसेच औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ॲपेक्स ॲथॉरिटी पहिल्या बैठकीत दिली.प्रकल्पाचा साताऱ्या जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपघातग्रस्त वारकऱ्यांशी संवाद साधतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे वारकऱ्यांशी विचारपूस केली. कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!