नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोहाली कसोटी सामन्यात भारताचा महान अष्टपैलू कपिल देव यांचा एक मोठा विक्रम तोडला आहे. त्याने या सामन्यात ६ विकेट्स घेत हा विक्रम तोडला.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला, “२८ वर्षे अगोदर मी कपिल देव यांना चेअर करायचो, कारण त्यांनी सर्वात जास्त विकेट घेऊन एक मोठा विक्रम केला होता. मला कधीच वाटले नव्हते की मी एक फिरकी गोलंदाज बनेल आणि आपल्या देशासाठी खेळून कपिल देव यांचा विक्रम मोडेल.”
अश्विनने सर्वात जास्त कसोटी विकेट घेणाऱ्यांच्या यादीत आता कपिल देव यांना मागे टाकले आहे. मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना त्याने हा विक्रम केला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४३६ विकेट्स घेतल्या आहेत. तर कपिल देव यांच्या नावावरती ४३४ विकेट्स होत्या.
महत्वाच्या बातम्या :


