मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ‘‘आम्हाला ‘आयपीएल’च्या सामन्यांची चिंता नाही, असे म्हटल्यास अयोग्य ठरेल. आम्ही सर्वोत्तम पद्धतीने स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज आहोत आणि यासंदर्भातील आव्हानांचीही आम्हाला जाणीव आहे. परंतु हे आमच्या नियंत्रणात नाही. टाळेबंदीची स्थिती उद्भवली, तर त्याच्याशी सामना करण्याची आम्ही तयारी केली आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने सांगितले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत. परंतु मुंबईत सराव करणाऱ्या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून, मुंबईत पहिला सामना १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तिकडे कर्जबुडव्या उद्योगपतींना मोकळे सोडायचे आणि इकडे सामान्यजनांचे खिसे कापायचे’
- ‘ही शेवटची वेळ आहे’ ; कोहलीवर इंग्लंडच्या फलंदाजाचा खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा आरोप
- ‘या धोरणात ना अर्थकारण आहे ना राजकारण असलेच तर हात दाखवून अवलक्षणच म्हणावे लागेल’
- नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण रस्त्यावर, प्रशासन क्वारंटाईन!
- ‘आधी दरवाढ करायची आणि निवडणुकांच्या तोंडावर दरकपात करून मतांचा जोगवा मागायचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

