Share

नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण रस्त्यावर, प्रशासन क्वारंटाईन!

Published On: 

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. पण प्रशासन या समस्येला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. उमरी शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून बुधवार पर्यंत २९४ एवढा आकडा होता तर गुरुवारी त्यात अकरा बाधितांची भर पडली असल्याने आता बाधित रुग्णांचा आकडा ३०५ एवढा झाला आहे. त्यातील बहुतांश रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वॉरंनटाईन केल्यानंतरही शहरातून खुलेआम फिरताना दिसत आहेत.

त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. अशा बाधित रुग्णांवर कारवाई करावी अशी मागणी होत असून या संदर्भात प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत शहरातील मोंढा परिसर भागातील अनेक कोरोना बाधित रुग्ण कोविड केअर सेंटरला न जाता होम क्वॉरंनटाईन झाले आहेत. परंतु ते बाधित असताना देखील आपल्याला काहीच झाले नाही म्हणून रस्त्यावरून खुलेआम फिरत आहेत.

होळीच्या दिवशीही बाधित अनेक जण होळी कार्यक्रमाला उपस्थित होते. तर अनेकांनी धूलिवंदनातही सहभाग घेतला होता. ही बाब गंभीर असताना देखील याकडे मात्र प्रशासनाच्या वतीने कसल्याच प्रकारचे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे मोंढा परिसर भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.घराबाहेर फिरणाऱ्या बाधित रूग्णावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून आता बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन केले जाणार नाही त्यांची रवानगी आता कोविड केअर सेंटर मध्येच केली जाईल असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!