मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होईल याबद्दल अद्यापही प्रश्चचिन्ह आहे.
यादरम्यान बीसीसआयने आयपीएल २०२० स्पर्धेत दोन नविन संघाचा समावेश होणार हे सांगितले होते. पण आयपीएल २०२१ स्पर्धाच अर्धवट असल्याने पहिली प्राथमिकता ही उर्वरीत स्पर्धा पुर्ण करणे ही आहे. त्यानंतर पुढील हंगामात सहभागी होणाऱ्या नविन संघाबद्दल विचार करता येईल. आता त्याबद्दल बोलायला कुणाकडेच वेळ नाही. असे बीसीसीआयच्या एका अधीकाऱ्याने सांगितले आहे. आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने पुढील हंगामासाठी दोन नविन संघासाठी निवीदा जाहीर करणे टाळले जाउ शकते अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
यावर्षीच्या आखेरीस दोन नवीन संघासाठी निवीदा निघणार होत्या असे बीसीसीआयने सांगितले. मात्र आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान बीसीसीआय समोर सध्या आहे. यादरम्यान पुढील काही महिन्यांत सर्व आंतरराष्ट्रीय संघांचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींचा विचार करुन बीसीसीआयला काही निर्णय घ्यावे लागतील तसेच आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण झाला नाही तर जवळपास २५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी डब्ल्यूटीसीसाठी कसून सराव करत आहे’ ; हनुमा विहारी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
- ‘त्याला मंगळावरही खेळवले तरी तो तसाच खेळेल’ डिव्हीलियर्सवर आकाश चोप्राची स्तुतीसुमने
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढली ; ‘हे’ मुख्य खेळाडू अजूनही अनफिट
- चेन्नईचा प्रशिक्षक मायकल हसीची पुन्हा एकदा कोरोनावर मात, मायदेशी रवाना
- ‘सिटीमार’ गाण्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ पाहून दिशाने पण दिली कमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

