Share

”विधान परिषदेत सावरकरांची तसबीर लावणे हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”

Published On: 

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद सभागृहाची डागडुजी करण्यात आली. यामध्ये काही स्वातंत्र्यसैनिकांच्या तसबिरींचा समावेश करण्यात आला. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही तसबीर लावण्यात आली. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तसबिरीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेतील ‘पिक्चर गॅलरी’चे उद्घाटन केले. याला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही विरोध दर्शवला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इंग्रजांना पत्र लिहून माफी मागितली होती, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. भाजपने इतिहास शिकण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची तसबीर लावणे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, अशी टीका यादव यांनी केली आहे.

दरम्यान, आता भाजप या मुद्द्यावरून नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रात देखील पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!