Share

‘दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लावा’; आपच्या आमदाराचा केजरीवालांना घरचा आहेर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. यामुळे कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चा करून ६ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती.

३ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सत्ताधारी आपमध्ये असंतोषाचा आवाज येऊ लागला आहे. आपचे आमदार शोएब इक्बाल यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी हे वक्तव्य दिल्लीमध्ये सध्या कोरोना संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर केले आहे. त्यांनी उच्च न्यायालयालाही विनंती केली आहे. दिल्लीत अव्यवस्था पसरत आहे, यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीमध्ये कोरोनामुळे हालत खूपच बिकट बनली आहे. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे. आता राज्य सरकारच्याच आमदाराने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या या लाटेने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेची त्रेधा उडविली आहे. लोकांना खूप संघर्ष करून हॉस्पिटलांमद्ये ना बेड मिळत आहे ना ऑक्सिजन. दिल्ली सरकार वेबसाईटवर बेड रिकामे असल्याचे दावे करत आहे, मात्र प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ह़ॉस्पिटलचे उंबरे झिझवावे लागत आहेत.

‘दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणती ऐकत नाहीय. मला तर उच्च न्यायालयाने इथे राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील,’ असे शोएब इक्बाल म्हटले आहेत.

दरम्यान, अरविंद केजरीवाल सरकारची सर्व सिस्टिम फेल ठरली आहे. राज्यात ऑक्सिजन सिलिंडरचा आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औषधांचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. त्यांना हे जमत नसेल, तर आम्ही केंद्र सरकारला सर्वकाही हातात घेण्याचे निर्देश देऊ, असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!