🕒 1 min read
औरंगाबाद : नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यातून पुणे मार्गे मुंबई बुलेट ट्रेन गेली पाहिजे. याकरिता आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजुला सारुन मराठवाड्याच्या दर्जेदार विकासाकरीता एकत्र काम करत मराठवाड्यात विकास खेचून आणू असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (दि.२६) औरंगाबाद येथे व्यक्त केला. त्याचबरोबर मराठवाड्याच्या विकासाकरीता दळणवळणाची साधने महत्वाची असून रस्त्याचा विकास झाल्यास मराठवाड्याचा विकास होईल. त्यामुळेच रस्त्याच्या कामांकरीता निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथे १४ व्या वित्त आयोगातून महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचे लोकार्पण तसेच कुंभेफळ ते टाकळी, केंब्रिज ते सावंगी रस्त्याच्या भूमिपूजनासह कुंभेफळ येथील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकरिता लवकरच निधी उपलब्ध करण्याकरीता मी व्यक्तीश: प्रयत्नशील राहील. पुढील तीन वर्षात मराठवाड्यात सुमारे ९०० कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरुड काझी ते एमआयडीसी, लाडगाव ते जडगाव या रस्त्यांकरीता ४ कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी संदीपान भुमरे म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधी चव्हाण यांनी मिळवून दिला. तसेच रोजगार हमी योजनेतून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकरीता निधी मिळवून देईल. प्रत्येक शेतीला पक्का रस्ता मिळावा याकरिता लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. त्याचबरोबर फळबागेकरीता जाचक अटी रद्द करुन छाननी समिती देखील बरखास्त करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्यामुळे निश्चित मदत मिळेल असे भुमरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
