🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे पुन्हा एका काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी (Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या एकमताने घेण्यात आला. दरम्यान, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी, असे वक्तव्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सिब्बल म्हणाले की,‘गांधींनी स्वइच्छेने बाजूला व्हावं कारण त्यांनी नियुक्त केलेलं मंडळातील लोक कधीच त्यांना तुम्ही नेतृत्व सोडा असे सांगणार नाही.’ तसेच या पराभवानंतरही काँग्रेसमधील नेत्यांनी सोनिया गांधींकडेच नेतृत्व असावं यासंदर्भातील निर्णय घेतल्याचे आश्चर्य वाटलं, असेही सिब्बल म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आमच्यासारखे अनेक नेते आहेत जे कार्यकारी समितीमध्ये नाहीत पण ते काँग्रेस पक्षात असून त्यांची मत वेगळी आहेत. आम्ही कार्यकारी समितीत नाही म्हणून आमच्या मतांचा फरक पडत नाही असं आहे का?’, असा सवालही सिब्बल यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
…त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह
-
“पंडित राहुल गांधी देशात मुस्लीम अजेंडा रेटण्याचा जोरदार प्रयत्न करताय”, भातखळकरांचा आरोप
-
“शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
