नवी दिल्ली : काल देशातील आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील आनंदी शहरांमध्ये पहिल्या २५ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. तर, एकूण ३४ आनंदी शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ अंतर्गत ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीनुसार पुणेकरांनी राज्याची राजधानी असलेल्या मुंबई व उपराजधानी असलेल्या नागपूरला देखील पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे पुणे हे राज्यातील आनंदी असलेल्या शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. अर्थातच, विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.
ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ही यादी तयार केली आहे. मागील अनेक दशकांपासून व्यवस्थापनसांदर्भातील संशोधनामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या एका प्रोजेक्टमुळे भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती ही पहिल्यांदाच समोर आली आहे.
लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड या तीन शहरांनी देशातून अव्वल स्थान पटकावले आहे. ही यादी वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. पुणे शहर १२ व्या स्थानी आहे. राज्याची उपराजधानी असणारे नागपूर शहर १७ व्या स्थानी तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई २१ व्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार; अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा
- सिंधुताईंच्या मदर ग्लोबल फाउंडेशनला मिळणार सामाजिक न्यायच्या अनुदानित वसतिगृहाची साथ
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
