🕒 1 min read
पुणे : सध्या देशामध्ये सगळीकडे दिवसेंदिवस गुन्हेगारी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या सगळ्या प्रकारामुळे नागरीकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागली आहे. अशातच विद्येच माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरामध्ये पतीने चक्क पत्नीला सर्वांच्या समोर अंघोळ करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आली आहे.
आपल्या पत्नीला मुलगा होत नसल्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीला सर्वांच्या समोर अंघोळ करायला लावली असल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. पिडीत महिलेचा नवरा तिच्याकडून वारंवार पैसे मागायची आणि ती रक्कम एक-दोन लाख नसून तब्बल 1 ते 2 कोटीच्या घरात असल्याचंही समजतं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाविरोधात पिडीत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यामध्ये पिडीत महिलेचा पती त्याचबरोबर तिची सासू, सासर्यांचाही समावेश आहे. या सगळ्यांविरोधात पिडीत महिलेवर वारंवार अत्याचार. तसेच तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेच्या पतीने त्याच्या व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी यासाठी मांत्रिकाच्या सहाय्याने आपल्या पत्नीसोबत एक पुजा केली. त्या पुजेमध्ये पिडीत महिलेला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. तसेच या प्रकरणी मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याला पकडलं नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा पुढचा तपाल भारती विद्यापीठ पोलील करत आहेतं
महत्त्वाच्या बातम्या :
- IND Vs ZIM | शुभमन गिलची बॅट तळपली, झिम्बाब्वेविरुद्ध झळकावले शतक; 290 धावांचे लक्ष्य
- Assembly Session 2022 | शंभूराज प्रत्येक गोष्टीत तोंड खुपसून स्वतःच हास करू नका – भास्कर जाधव
- Chhagan Bhujbal। देशात अध्यक्षीय पद्धत लागू करायची आहे का?; नगराध्यक्ष पदाबाबतचाच्या निर्णयावरून भुजबळ संतप्त
- Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी हिचा व्हिल चेअर वरील योगा पाहून व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ
- Devendra Fadnavis | विनायक मेटेंचा अपघात की घातपात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
