Share

मोठी बातमी : ‘या’ बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द

Published On: 

🕒 1 min read

पुणे – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

याबाबतचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी जारी केले. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९८ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा महामंडळाकडून प्राप्त होईल. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने सहकार आयुक्त यांना बॅंकेवर अवसायक नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही. आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.

बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला असला, तरी बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. ठेवीदारांना ओळखपत्रांसह (केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक) आपला दावा सादर करावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे मे २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेनं मुंबईतील सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर बँक लिक्विडेशन प्रक्रिया करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!