🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा समाज आक्रमक झाला असून भाजप खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी ५ प्रमुख मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची सुरुवात करू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असे ट्वीट खासदार संभाजीराजे यांनी केल्याने सोमवारी सायंकाळनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ‘छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे,’ असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहमंत्र्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर संभाजीराजे यांनी रात्री साडेआठ वाजता आपले ट्वीट मागे घेतले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा फोन आला, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे माझे समाधान झाले, विषय संपला… असे पुन्हा ट्वीट करून त्यांनी या विषयावर पडदा टाकला खरा, परंतु आधीच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता.
त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली.
परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता.
माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे.
(१/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण, मला हेच लक्षात येत नाहीये की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असे ट्वीट केले. त्यात त्यांनी राज्य सरकार की केंद्र सरकार पाळत ठेवत आहे, याबद्दल स्पष्ट केलेेले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण,म्हणाले…
- पेट्रोल नॉट-आऊट @शंभरी पार; पुणेरी शैलीत काँग्रेसची मोदी सरकारला चपराक !
- २४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर; ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
- ‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
- पुण्यापाठोपाठ आता आणखी एका शहरात सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
