पुणे : राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती असून आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला असल्याचं समजतं आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.
यानंतर पुढे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.
दरम्यान, आता पूजा चव्हाणच्या आई वडिलांच्या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- चहल-कुलुदीपची धमाल मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
- रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


