🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मात्र, लसीकरणामुळे देशातच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना थेट लस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर पुणे महानगरपालिकेनंही या निर्णयाचं अनुकरणं केलं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर लसीकरण कोणत्या पद्धतीने आणि आठवड्यातील कोणत्या दिवशी केलं जाईल याबद्दलची माहिती ट्विट करून दिली आहे.
‘शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर हा ड्राईव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करु नये. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,’ असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.
या लसीकरणासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून, सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आगे आगे देखो होता है क्या! आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर’, किरीट सोमैय्यांचा इशारा
- ‘मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास केला’
- ‘क्या हुआ तेरा वादा?’, चित्रा वाघ यांच्याकडून जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
