🕒 1 min read
पुणे – पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.
या निर्णयाची माहिती देताना सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहाणार. याशिवाय विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभास 50 लोकांना आणि अंत्यसंस्कारात 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. धार्मिक स्थळं देखील बंद ७ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत.
PMPML बससेवा 7 दिवस बंद असणार आहे केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. आठवडे बाजारही बंद करण्यात येणार असून संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत मात्र शाळा महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिम सुरु राहणार असून दिवसभर जमावबंदी असणार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार आता या हिंदी मालिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
