मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना २९ मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ३१ मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरद पवार यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इस्पितळात होणाऱ्या उपचारांना शरद पवार चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात आल आहे.
काल संध्याकाळी ७ वाजता डॉ. अमित मायदेव यांनी त्यांची तपासणी केली आणि आता त्यांना चालण्यास व जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी दिली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
Update
Our party President Sharad Pawar saheb is responding well to the treatment in hospital and is in pink of health.
He was checked upon by Dr. Amit Maydeo at 7 pm this evening and he is now allowed to walk and intake solid foods.
Regular updates on his health to follow.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 1, 2021
दरम्यान, शरद पवार यांचा १ ते ३ एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील असे मंत्री नवाब मलिक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘मानसिक तयारी ठेवा…मंदिरे बंद, दुकाने बंद, मॉल बंद…फक्त पब आणि बार सुरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

