मुंबई : आपल्या अभिनयाद्वारे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आता एका हिंदी मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी टिव्हीवर प्रसारीत होणाऱ्या मेरे साई श्रद्धा और सबुरी या साईबाबावर आधारीत मालिकेत भार्गवी चिरमुले प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खुप प्रेम मिळाले आहे. मराठी अभिनेता तुषार दळवी या मालिकेत साईबाबाची मुख्य भूमिका साकारत आहे.
भार्गवीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकेत काम करुन मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता मेरे साई या मालिकेद्वारे हिंदी मालिकेच्या क्षेत्रात आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी भार्गवी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या आगामी कथानकात होणाऱ्या काही बदलात भार्गवी चंद्रा बोरकर या भूमिकेत दिसणार आहे. चंद्रा ही साईबाबाची बहिण आहे. दोन मुले आणि नवरा असे सुखी कुटूंब असताना चंद्राचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी कुटूंबाचा त्याग करतो. कुटूंबाची जबाबदारी पुन्हा स्विकारावी म्हणून साई बहिनीच्या पाठीशी उभे राहत तिच्या पतीला त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.
मेरे साई या मालिकेत मिळालेल्या चंद्राच्या भूमिकेमुळे भार्गवी चिरमुले खुश आहे. भार्गवी म्हणाली की मला साईबाबाच्या बहिणीची भूमिका करायला मिळते ही खुप भाग्याची गोष्ट आहे. ही भूमिका म्हणजे साईबाबांचा आशिर्वादच आहे असे मला वाटते. ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजता सोनी एन्टरटेन्मेंट या वाहिनीवर प्रसारित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दबावामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू’ द्रमुकच्या नेत्याचे गंभीर आरोप
- शाहरुखला आयपीएलआधी मोठा दिलासा ; ‘हा’ खेळाडू कॅम्पमध्ये होऊ शकतो सहभागी
- ‘उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा ?’
- आयपीएल न खेळता ‘या’ खेळाडूला मिळणार 7 कोटी रुपये
- आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला ; टी नटराजनला मिळाली थार

