पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात काल ( २४ जून ) सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.
आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आयुक्तांनी आश्वासन दिलं असतानाही काल सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली.
दरम्यान, या तोडकामावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा’. असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या टीकेला आता मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचं पुण्यात येणं कमी झालेलं आहे. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माहिती घेऊन बोललं तर बरं होईल, असं महापौर मोहोळ म्हणाले आहेत. तर, मला झेपत नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं, असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र – दिलीप वळसे-पाटील
- ‘आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा;’ केशव उपाध्येंची टीका
- १५ वर्षानंतर राष्ट्रपतींचा रेल्वे प्रवास, २००६ मध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी केला होता देहरादूनचा प्रवास
- मुलानेच केली पित्याची हत्या! अडीच महिन्यानंतर शवविच्छेदन अहवालातून प्रकार आला समोर


