पुणे : पुणे शहरात गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान करणार्या नागरिकांना महापालिकेतर्फे दोन किलो कंपोस्ट खत मोफत देण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व विसर्जन घाट, हौद, टाक्या या ठिकाणी मूर्तीदान करणाऱ्यांना खत वाटपाची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून विसर्जनासाठीचे सर्वच नैसर्गिक घाट पाण्याखाली बुडाले आहेत. अशावेळी नागरिकांनी नदीकिनारी न जाता आपल्या भागातल्या महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम हौदांचा विसर्जनासाठी वापर करावा, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १३ तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील फळं, फुलं आणि भाजी बाजार तसंच खडकी, मोशी आणि मांजरी उपबाजार बंद राहणार आहेत. असं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
पाचपुते सोडून मी दुसऱ्याची शिफारस करेलच कशी ? – सुजय विखे
आरक्षणावरून राज्य सरकार बनवाबनवी करतंय : अजित पवार
इमरान खान आणि नरेंद्र मोदी एकाच आईची मुले : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

