Share

पुणे : सौम्य लक्षणे असणार्या कोरोनाग्रस्तांवर होणार घरीच उपचार

Published On: 

पुणे – कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर स्वत:च्या घरीच उपचार केले जाणार आहेत. घरात उपचार करण्यासाठी स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृहाची सुविधा असणार्या रुग्णालाच घरी उपचार घेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

शहरातील अॅक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ चा शिक्का मारून घरी सोडण्यासंबंधीची कार्यवाही सुरू केली आहे. यापुढे रूग्णांकडून घरातच राहण्याचं हमीपत्रही घेण्यात येणार आहे. अशा रूग्णांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार देण्यात येतील. या निर्णयामुळे पालिका आरोग्य यंञणेवरील 25 टक्के ताण कमी होणार आहे.

दाट वस्तीबाबत मात्र वेगळा निर्णय

एकीकडे पालिकेने यापुढे घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला असला तरीही दाट वस्तीमधील रूग्णांना मात्र कोविड सेंटरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘को मॉर्बिड’ रूग्णांवरही हॉस्पिटलमधेच उपचार होईल. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात काल, शुक्रवारी 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पालिकेचा नियोजान्शुन्य कारभार, पुण्यातील उद्याने पुन्हा बंद करण्याची नामुष्की

औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही

पुण्यात अजितदादांचीच ‘दादागिरी’, भाजपच्या ‘त्या’ निर्णयाला केराची टोपली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!