Share

पालिकेचा नियोजान्शुन्य कारभार, पुण्यातील उद्याने पुन्हा बंद करण्याची नामुष्की

Published On: 

पुणे- पुण्यातील उद्यानं पुन्हा बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उद्यानांची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांची कमी उपलब्धता यामुळे पुण्यातील उद्यानं पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी महापालिकेने लॉकडाऊनमधुन सुट देत शहरातील 33 उद्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या उद्यानांमधे लोकांची गर्दी दिसू लागल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.

टाळेबंदी शिथील करून पुणेकरांना काही सवलती देताना शहरातील उद्याने सुरू करण्यात आली होती. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी २ जून रोजी नागरिकांना फिरण्यासाठी शहरातील ३३ उद्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अनेक दिवस उद्याने बंद असल्यामुळे नागरिक फिरण्यासाठी गर्दी करत होते.

उद्यानात शारीरिक अंतर न पाळणे, तोंडाला मास्क न लावणे, खुल्या व्यायाम शाळेतील साहित्य वापरणे, सुरक्षारक्षकांची वाद घालणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या.त्याशिवाय कमी मनुष्यबळ असतानाही उद्यानासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे सुरू केलेली उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली होती. काही बेशिस्त नागरिकांनी पुरेशी काळजी न घेतल्याचा फटका आता उद्यानात फिरण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच बसणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १६ हजार ७५२ झाली आहे. यापैकी ५१ हजार ९३५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ५९ हजार १६६ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर काल दिवसभरात ११४ रुग्णांचा मृत्यु झाला. कोविड-१९ मुळं राज्यात आजवर ५ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. काल राज्यात ३ हजार ३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्व खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात : प्रकाश जावडेकर

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल होणार बंद

#corona_effect : पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांचा मोठा निर्णय : यंदा गणेशोत्सव साधेपणाने !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!