औरंगाबाद : राज्यातील मुंबई, पुण्यासह आता औरंगाबाद जिल्हाही कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनला आहे. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. हे सर्व सुरु असताना आता औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नसल्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल कॉरंन्टाईन ठेवण्याचे सुनील केंद्रेकर यांचे आदेश आहेत. पुण्या-मुंबईतून लोकं आली म्हणून रुग्ण संख्या वाढली. नागरिकांच्या मदती शिवाय जिंकणे अशक्य असल्याचे त्यानी म्हटले आहे. कोरोनाची लक्षण दिसल्यास लोकं घरी राहतात. ऑक्सीजनही घरीच लावण्याचा प्रयत्न करताना समोर आलं आहे, असं केंद्रेकर यांनी सांगितलं. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, राज्यात काल १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३२५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ९३ हजार ७८४ नमुन्यांपैकी ९४ हजार ०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६९ हजार १४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
लढाई जिंकणार : कोरोना बरे झालेल्यांची विक्रमी संख्या; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले
प्रशासन आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली, तुळजापूर तालुका झाला कोरोनामुक्त
ठाकरे सरकार चांगले काम करत आहे, गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

