पुणे : पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते प्रत्येकी नऊ मीटर रुंद करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरण्यासाठी बंधने उठवण्यात आली आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर सोडाव्या लागणाऱ्या साईट मर्जिंनमध्ये सूट देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर भाजपने हा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप होता.
भारत-चीन तणाव : चीनच्या उलट्या बोंबा, वाचा काय म्हटलंय चीनने ?
काही बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा हा प्रस्ताव असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला होता. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता. या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनीही बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका असे निर्देश दिले होते.
महाविकास आघाडीच्या पालिकेतील गटनेत्यांनी, राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्थगितीची मागणी केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

