Share

…अन्यथा मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालू.

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- येत्या 15 दिवसात पगारी पुजारी नेमण्यासह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मंत्रालयाच्या दारात आई अंबाबाईचा गोंधळ घालण्याचा इशारा पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे .पुजारी हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक झाली असून याबाबतचे निवेदन समितीने महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्बात गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरु आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर, पंढरपुर, साईबाबा देवस्थान शिर्डी, तुळजा भवानी मंदिर, तुळजापुर या मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरात देखील पगारी पुजारी नेमण्याची याआधी मागणी करण्यात आली होती. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी 20 जुन 2017 रोजी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या समितीकडून राज्य सरकारने 15 दिवसात पुजारी हटाव, पगारी पुजारी नेमणे आणि अन्य मागण्या मान्य न केल्यास प्रथम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मुंबईत मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घातला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!