Share

विडी,सिगारेट विक्रीवर तात्पुरती बंदीसाठी जनहित याचिका, आडम मास्तरांचा कडाडून विरोध

Published On: 

सोलपुर – विडी आणि सिगारेट मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन फुफुसावर विपरीत परिणाम होतो आणि कोरोनाचा संसर्ग वाढतो. म्हणून विडी आणि सिगारेट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची जनहित याचिका स्नेहा मारजाडी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी 4 मे रोजी असल्याचं उच्च न्यायालयानं नुकतंच जाहीर केलं आहे.

याचिकेवर सिटू संलग्न ‘लाल बावटा विडी कामगार युनियन’ने आक्षेप घेतला आहे. 4 मे च्या या सुनावणीला आपण न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती युनियनचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी दिली.

महाराष्ट्रात गेल्या दीडशे वर्षापासून हे उद्योग अस्तित्वात असून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे रोजगाराचे साधन आहे. याला पर्यायी रोजगार नाही. या उद्योगावर बंदी घातल्यास कामगार बेचिराख होतील. आज राज्यात मद्यपानाला सवलत आहे याबाबत कोणीही चकार शब्दांने तक्रार करत नाहीत पण लोकांच्या रोजीरोटी विरुद्ध जनहित याचिका दाखल करतात असे संताप व्यक्त केले.

वास्तविक पाहता विडी धुम्रपान केल्याने कोरोनाचा संसर्ग होतो याला कोणताही आधार नाही. याबाबत अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून शास्त्रशुद्ध अहवाल मांडलेला आहे. या अहवालाचा आधार घेऊन व विडी उद्योगावरील हा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने उद्योग टिकवून रोजगार वाचविण्याची भूमिका घेऊन न्यायलयात भक्कमपणे कामगारांची बाजू मांडावी व विडी उद्योगावरील संक्रांत हटवावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!