मुंबई : जी 23 गटातील जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे नाराजगी व्यक्त केली आहे. गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यावरूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष हा मुघल सल्तनत आहे का?, असा सवाल केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रीयाः
गांधी परिवाराने तुम्हाला पदं दिली, तुम्ही खुश झाले पाहिजें काँग्रेस पक्ष वैयक्तिक मालकीचा नाही, हा लोकशाही मार्गे चालणारा पक्ष आहे, त्याची एक घटना आहे, हा पक्ष घटनेप्रमाणे चालला पाहिजे, मागील 24 वर्षात लोकशाही पद्धतीच्या निवडणुका झाल्या नाहीत याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत खंडारे यांना मतदान न करता पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या सात आमदारांवर कारवाई होत नसेल तर काय बोलणार? असा धक्कादायक आरोप चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतः
दरम्यान, स्वतः राहुल गांधी कुठल्या कुटुंबातील आहेत? असा सवाल करत पक्षात मनाने निर्णय घेत आहात, एका कुटुंबातील जास्त पक्षात नको, काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल तर लोकशाही पद्धतीने सगळी पदं भरली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय?, पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला उपाय
- Shivsena । “जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे, तशीच महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना तयार झाली”
- Rajan Vichare | “आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत”राजन विचारे यांचा शिंदे गटावर हल्ला
- Tripti Desai । “उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे, म्हणून तर…”; शिवसेना-संभाजी ब्रिगेट युतीवर देसाईंच मोठं वक्तव्य
- Rajan Vichare | आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, हे जनताच ठरवेल- राजन विचारे


