🕒 1 min read
बार्शी : कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी अनेक आमदार खासदारांनी कंबर कसली होती. अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत.
दरम्यान,तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे यंदा मात्र निवडणुका लागल्या आहेत.तिन्ही प्रभागातून 9 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.विशेष म्हणजे बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये तब्बल 9 निवडणुका बिनविरोध करून सलग 50 वर्षे बिनविरोध राहण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकात होता.
15 तारखेला मतदान असलेल्या या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेला संपल्यानंतर काल निवडणुकांचं अंतिम चित्र स्पष्ट झालं. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतींपैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून 360 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 13 पैकी 103 ग्राम पंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. धुळे जिल्हातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून आता 183 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेतलं जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात 74 ग्रामपंचायतींची निवडणुक बिनविरोध झाली.लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या घोषीत 408 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फक्त 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात 778 पैकि 92 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी : सावंत
- महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत भाजपाच्या मनिषा धावडे झाल्या नागपूरच्या उपमहापौर
- औरंगाबाद नामांतर : रेशीमबागेत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध कधी करणार; खरातांचा सवाल
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार : गडकरी
- पुणे जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तु,किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
