🕒 1 min read
नवी दिल्ली: यावर्षी देशात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये 2021 मध्ये सुझुकीची बर्गमन मार्केट मध्ये प्रथम दाखल होईल. कंपनी हि इलेक्ट्रॉनिक सेग्मेंट आणत आहे. या स्कूटरची किंमत सुमारे एक लाख असू शकते.
भारतीय बाजारपेठेत सुझुकीची ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर असेल. तीला लिथियम आयन बॅटरीसह लॉन्च केले जाऊ शकते. हि स्कूटर एकाच वेळेच्या चार्जिंग मध्ये 100 ते 120 किमीची प्रवास करेल . या स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रति तास असेल.
सुझुकीच्या इलेक्ट्रानिक स्कूटर मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, अॅलोय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स देऊ शकतात . या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि एक डेडिकेटेड एप देखील दिले जाऊ शकते. हे केवळ चार सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाढेल. असे फीचर्स या वइलेक्ट्रानिक स्कूटर मध्ये असणार आहेत.
या स्कूटरच्या प्रोटोटाइप मोडेलचे फोटो समोर आले असून यात एलईडी ड्रिलसह हॅलोजन हेडलॅम्प दिले जाऊ शकतात. सध्या बाजारात याची पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे, त्यामध्ये पूर्ण एलईडी सेटअप देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेत सुजुकी बर्गमन बजाज चेतकशी स्पर्धा करू शकते. बाजारात बजाज स्कूटरची किंमत एक लाखांपासून सुरू होते. तसेच, हि स्कूटर Tvs iQube शी देखील स्पर्धा करू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीचा जीआर : SEBC आरक्षण वगळून होणार भरती; मराठा समाजाला मोठा धक्का !
-
पारनेर तालुक्यातील केवळ एका जागेसाठी चार गावे 25 लाखांना मुकले
नवदीप सैनीसह हिटमॅन रोहित शर्माच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, तर ‘या’ खेळाडूंना डच्च
- अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
- तेलाच्या जाहिरातीतून सौरव गांगुलीला काढल्यानंतर अडानी ग्रुपच स्पष्टीकरण
- सेक्रेड गेम्स’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, नवाझुद्दीनचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
