🕒 1 min read
मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.
संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली.
या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सद्या औरंगाबादच्या नामांतरावरून बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता थोरात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाबाबतची चर्चा देखील केली.
या चर्चेविषयी अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. ‘एच. के पाटील हे महाराष्ट्रातील आमदारांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्षांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणूकांसाठी पूर्वतयारी कशी असावी, यावर सध्या अधिक भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने आज चर्चा झाली. एका व्यक्तीकडे एकच पद असावं की नाही याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,’ असं ते म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर, आमदारांच्या मतदारसंघात पुरेसा निधी मिळत नाही, याबाबत पाटील यांनी आज मते जाणून घेतली आहेत. येत्या काळात त्यावरही चर्चा होईल,’ असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारनं घोषणा केली दहा हजारांच्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना मिळाले फक्त दोन हजार
- सुझुकी लवकरच आणणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
- तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील आदर्श मळेगावात यंदा होणार निवडणुका
- ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्र पाठवली होती’
- अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
