औरंगाबाद : औरंगाबादकरांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांची घोर निराशा होत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवरच औरंगाबाद महापालिकेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अंकिता विधाते यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत औरंगाबाद शहरात कोरोना लसींचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद शहरात १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यापासून तरूणांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी रांगा लावत आहे. दररोज १५ ते २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता आहे. महापालिकेने ११५ वॉर्डात लसीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. मात्र मागणीच्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. मध्यंतरी लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले.
मात्र आता पुरवठा अचानक कमी झाल्याने लसींचा दुसरा डोस घेणार्यांपैकी अनेकांचा कालावधी उलटूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा दुसरा डोस थकलेला आहे. त्यामुळे लसींचा पुरवठा वाढवून देण्याची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे. मात्र त्यानंतरही पुरवठा कमीच होतो आहे. या पार्श्वभूमीवरच माजी नगरसेविका अंकिता विधाते यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत औरंगाबादला मुबलक कोरोना लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री टोपे यांनी आश्वासित करत वरिष्ठ अधिकार्यांना लसींचा पुरवठ्यासंदर्भात सूचना केल्याचे विधाते यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
- आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठ्यासाठी मनसे आक्रमक, मनपा आयुक्तांचेच नळ कनेक्शन कापले
- ‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक वक्तव्य
- बहुजनांना जागे करणारे अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनुर होते – रामदास आठवले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा महिको सोबत करार, संशोधनासाठी विद्यार्थ्यांना होणार फायदा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

