पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. नुकतीच त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येते आहे. खडसे यांचे जावई सध्या कोठडीत आहे. तर शिवसेनेचे नेते तथा अनिल परब यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
या प्रकरणांमुळे केंद्रातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. परंतू सर्व काही नियमांप्रमाणे होत असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’ अशी टीका चव्हाण यांनी केली.
पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असे होत नव्हते. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पण दुसऱ्या कुण्या नेत्याला प्रवेश दिला की भाजपात धुतल्या तांदळासारखे होते, आणि नंतर काय झालं? असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक वक्तव्य
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- आठवले दोन दिवसांत पलटले! शिवसेनेला म्हटले भाजपसोबत या, अन् आज केले राष्ट्रवादीला आवाहन
- ‘..तर मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?’, आठवलेंचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न
- ‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

