औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बियाणे क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिको यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. बौध्दिक संपदा हक्क यासह विविध संशोधन प्रकल्पास या करारामुळे गती मिळेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १६) बैठक होऊन करारावर स्वाक्षरी झाली आहे.
यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.भालचंद्र वायकर, डीएसटी-फिस्ट प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिकोचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ.भारत आर. चर व वैज्ञानिक डॉ. स्मिता व्ही. कुरुप यांची उपस्थिती होती. या करारांतर्गत महिको व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात बौध्दिक संपदा हक्क संशोधन प्रकल्प या संदर्भात अदान-प्रदान करण्यात येणार आहे.
कपाशी वर पडणारे रोग तसेच सॉईल ऑर्गेनिक कार्बन तसेच उपग्रहाच्या माध्यामातून संशोधन करण्यात येणार आहे, महिकोच्या उषा बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. आगामी तीन वर्षे या कराराची मुदत असणार आहे. विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी व डॉ. रत्नदीप देशमुख तर महिकोच्या वतीने डॉ. भारत चर व डॉ. स्मिता कुरुप यांनी करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे’, यशोमती ठाकूर यांचे पांडुरंगाला साकडे !
- मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही- अॅड. अनिल परब
- विठुरायाच्या पंढरीत कडक संचारबंदी लागू, बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही
- ‘एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक ; नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार’
- बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

