औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन ग्राइंडरने कट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मनसेच्या वतीने शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले होते. नसता मनपा आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यावर ‘अॅक्शन मोड ऑन’ करत मनसेने पहाटेच आयुक्तांच्या बंगल्याचे कनेक्शन तोडले.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा प्रश्न हाताळत आठवड्यातून दोनदा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या होत्या. परंतु आयुक्तांनी त्यावर आठवड्यातून दोनदा पाणी देणे शक्य नसल्याचे भाष्य केले होते. यासाठी दिनांक ७ रोजी मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी पत्रकार परिषद घेत दहा दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून शहरवासीयांना एक दिवस आड पाणी मिळावे यासाठी मनपा आयुक्तांनी प्रयत्न करावे नसता दहा दिवसानंतर मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाचे नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा दिला होता.
दरम्यान दहा दिवस होताच रविवारी पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांचे शासकीय निवासस्थान गाठत नळ कनेक्शन वर ग्राइंडर फिरवत त्याला तोडून टाकले. त्यानंतर घोषणाबाजी करत ते तिथून निघून गेले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- आठवले दोन दिवसांत पलटले! शिवसेनेला म्हटले भाजपसोबत या, अन् आज केले राष्ट्रवादीला आवाहन
- ‘..तर मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?’, आठवलेंचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न
- ‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण
- ओवैसींच्या एमआयएम पक्षांचे ट्विटर अकाउंट हॅक, ‘या’ व्यक्तीचा फोटो पोस्ट केल्याने कार्यकर्ते गोंधळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

