🕒 1 min read
औरंगाबाद : प्रत्येक इमारतीत विद्युतचे काम हे महत्वपूर्ण असते, विद्युत विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग असल्याने औरंगाबाद सारख्या महत्वाच्या शहरात व मध्यवर्ती ठिकाणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.
स्नेहनगर येथे अधीक्षक अभियंता (विद्युत) दक्षता व गुणनियंत्रण मंडळाच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चव्हाण हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय शिरसाठ, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार प्रदीप जैस्वाल आदी उपस्थित होते. मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे औरंगाबाद येथे विद्युत विभागाचे दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे मुख्य कार्यालय याठिकाणी तयार होणे. आणि म्हणूनच या कार्यालयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे गुणवत्तापूर्वक व वेळेत काम होणे अपेक्षित असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग बंद करावा अशी मागणी पूर्वी होत होती. हा विभाग बंद नाही तर अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
आणि म्हणूनच ५ कोटींचे टेंडर मर्यादा वाढवून १५ कोटींची टेंडर मर्यादा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. चव्हाण म्हणाले की, इलेक्ट्रिकल विंग ही अत्यंत महत्वाची असल्याने वेळोवेळी इलेक्ट्रिकल ऑडिट झाले पाहिजे असे निर्देश संबंधितांना त्यांनी यावेळी दिले आहेत. आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, विद्युत विभागातील सर्व अधिकारी या इमारतीमुळे एका छत्राखाली आल्याने वेळेत कामे होण्यास निश्चितच मदत होणार आहे. यावेळी शिरसाठ यांनी क्रांती चौकापासूनचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
