🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील दररोज दोन ते तीन हजार रुग्णांची भर पडत असून शहरातील स्थिती बिकट होत आहे. अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय शोधताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्तांना सेवा देण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड मधील रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला आहे. मागील टाळेबंदी असो वा आता पुन्हा करण्यात आलेली टाळेबंदी, हातावर पोट असलेल्या नोकरदारांना-व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
अनेकांचा रोजगार गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच काही अवस्था रिक्षाचालकांची झाली आहे. घराचे-रिक्षाचे हप्ते, कुटुंबाचा सांभाळ खर्च याचे ओझे डोक्यावर असताना रिक्षाचालक समाजसेवेसाठी पुढे आल्याने त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे. याबाबत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील ट्विट करून त्यांचे कौतुक केले आहे.
समाजाचं आपणही काही देणं लागतो, या शुद्ध भावनेतून पिंपरी चिंचवड शहरातील काही तरुण रिक्षाचालकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत रुग्णालयात घेऊन जाण्याची सुरू केलेली सेवा ही माझ्या मते खरी ईश्वरसेवा आहे. ही निस्वार्थ सेवा देणाऱ्या या देवदूतांना माझा त्रिवार सलाम! pic.twitter.com/OOQQAEFPTv
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2021
‘समाजाचं आपणही काही देणं लागतो, या शुद्ध भावनेतून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुण रिक्षाचालकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत रुग्णालयात घेऊन जाण्याची सुरू केलेली सेवा ही माझ्या मते खरी ईश्वरसेवा आहे. ही निस्वार्थ सेवा देणाऱ्या या देवदूतांना माझा त्रिवार सलाम!’ असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन शक्य नाहीत; उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती !
- भाजप नेत्याचे नीच राजकारण ! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर आक्षेपार्ह टिपण्णी
- रॉयल शेतकरी ! ३५ वर्षांनी घराण्यात मुलीचा जन्म, आजोबांनी ‘लक्ष्मी’ला हेलिकॉप्टरने आणलं घरी
- ‘जावडेकरजी, कुठे आहेत १,१२१ व्हेंटिलेटर्स ? पुण्याला विशेष कोट्यातून लस कधी मिळणार?’
- मोदींच्या मतदारसंघात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, नवीन रुग्ण दाखल करून न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
