मुंबई : कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. अनेक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश असल्याचे दिसत आहे. आता यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी यंदा वारीला गेली आहे. एक अभिमानाची बाब म्हणजे कश्मिरा तिथे वारकऱ्यांची सेवा करत आहे.
अभिनेत्रीने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “पंढरीची वारी, वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो. अशाच एका वारीचा अनुभव”
https://www.instagram.com/p/CfL3g3tv95y/
व्हिडीओमध्ये कश्मिरा कुलकर्णी वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना, कधी त्यांना जेवण देताना तर कधी वारकऱ्यांचा पायांना मालिश करून देताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. अनेक जण तिचे कौतुक करत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


